Posts

Showing posts from July, 2020

Paus ( Mansoon)  पाऊस

Paus ( Mansoon)  पाऊस… It was raining continuously today since morning. I was standing near my favorite window and watching beautiful raindrops falling on my terrace. In no time, drizzles and droplets falling and creating nice forms and shapes mesmerized me. This magical and harmonious drizzles of water drops was going on and on for a while and I was observing nature's miracle. Unknowingly, my mind drifted in past and uncovered some memories of childhood. On such a rainy day, isn't it common for mind to be nostalgic and to rekindle some of the long forgotten memories? I remember, like today, it rained a lot that day. It was Mansoon month - June and schools just opened up for us after summer vacation. We were in new classes with new books and uniforms. I being 9 years old big girl would take my 7 year old sister to school by bus. That day, after school, we were waiting for bus at its bus-stop, but it seemed to be late. It could be due to continuous rain may be.  After ...

बाटलीतील मासे गेले कुठे?

बाटलीतील मासे गेले कुठे? आमचे बालपण हे स्मार्टफोन,टेलिव्हिजन, कम्प्युटर्स आणि इत्यादी इलेक्ट्रॉनिक उपकरणांशिवाय पार पडले. सहाजिकच भावंडांशी तसेच मित्रमंडळींशी खेळणे, हुंदडणे आमच्या लहानपणाचा अविभाज्य भाग होता. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे आमच्यासाठी एक आनंदाची पर्वणी असे. आत्ते, मावस- चुलत भावंडांना भेटणे त्यांच्याबरोबर राहणे व त्यांच्याशी खेळत सुट्टी घालवणे हा आमचा महिनाभराचा कार्यक्रम होता. रोज रात्री गच्चीवर गाद्या घालून आकाशातील तारे मोजत गाढ झोपी जाणे. सकाळी उठून चहा पीत दिवसभराचा कार्यक्रम आखणे. दुपारी पत्ते कॅरम व व्यापार खेळणे हा नित्यक्रम होता. आम्ही सर्व भावंडे सहा महिने ते  तीन वर्षाच्या अंतरातील म्हणजेच समवयस्क होतो. त्यामुळे एकत्र खेळणे आणि भांडणे करणे दोन्ही रंगत असे. "चला आज काहीतरी नवीन करूयात का? सगळ्यांनी ओढ्यावर मासे पकडायला जायचे का? गंमत येईल ना खूप!"  आमच्या लीडर भावाने विचारले. पाण्यात खेळायला मिळणार त्यामुळे सर्वांनी एकमताने हो सांगितले. आईच्या आणि आजीच्या अनेक सूचना नंतर सर्वांचा जवळच्या ओढ्यावर मासे पकडायला जाण्याचा प्लॅन ठरला. घराच्या जवळच मा...

मोती…

मोती… बस स्टॉपजवळ एक मोठं कडुनिंबाचं झाड होतं. त्या झाडाच्या बुंध्याच्या खड्ड्यात एका कुत्रीने पिल्लं घातली होती. झाडाची सावली त्यांचं उन्हापासून संरक्षण करत होती.  शाळेतून येताना व जाताना त्या पिल्लांना बघणं हा माझा रोजचा कार्यक्रम झाला होता. ती कुत्री गुरगुरून जवळ येऊ देत नसे. जवळ जवळ एका आठवड्याने पिल्लांनी डोळे उघडले व ती पिल्लं इकडे तिकडे चालू लागली. एव्हाना डब्यातील उरलेली पोळी व बिस्किटे कुत्रीला खाऊ घालून तिच्याशी थोडी मैत्री जमली होती. आता ती गुरगुरत नसे. एक महिन्यात ही पिल्लं शेपटी वर करून सैरावैरा पळू लागली होती. आम्ही सर्व मुलं त्यांच्या भोवती घोळका करून रोज खेळू लागलो. घरी येऊन आईला कुत्र्याच्या पिल्लांच्या गोष्टी सांगायचो. या सर्व पिल्लांमध्ये एक भुऱ्या रंगाचं पिल्लू माझं लाडकं झालं होतं. त्याचा भुरा रंग आणि काळेभोर डोळे मला खूप आवडायचे. मी बसमधून उतरताना दिसले, की ते पळत यायचं आणि अंगावर उड्या मारू लागायचं. बसस्टॉपपासून घर दहा मिनिटांच्या अंतरावर होतं. एके दिवशी घरी जाताना हे भुरं पिल्लू मागे पळत पळतआलं. कितींदा बस स्टॉपवर सोडलं तरी परत मागे मागे येत होतं. शेवट...

पाऊस

       आज दिवसभर पावसाने चांगलाच जोर धरला होता. सकाळपासून संततधार चालू आहे. माझ्या आवडत्या खिडकीतून मी पावसाच्या टेरेसवर पडणाऱ्या धारा न्याहळत होते. साठलेल्या पाण्यात टपोरे थेंब पडून वर्तुळे तयार होत होती , त्या वलंयांना निरखत निरखत मन भूतकाळात कधी गेले ते कळलेच नाही. मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या आठवणींना हा पाऊस नेहमीच वाट देतो. त्या दिवशीही असाच मुसळधार पाऊस लागला होता. जूनचा महिना होता तो. आमची नुकतीच  शाळा सुरु झाली होती. मी आणि माझी लहान बहीण शाळा सुटल्यावर बस स्टॉपवर बसची वाट पाहत उभे होतो. माझे वय वर्ष नऊ आणि बहिणीचे सात वर्षे. माझी लहान बहीण  म्हणजे एक स्वच्छंदी जीव. साठलेल्या पाण्यात उड्या मारून मारून तिने आधीच तिचा युनिफॉर्म ओला केला होता. एक-दोन-तीन करून तिच्या उड्या चालूच होत्या. बस  येण्याची वेळ निघून गेली होती , खूप वेळ वाट पाहून आता बस येणार नाही अशी माझी खात्री झाली होती. पावसाळ्यात बसेस कॅन्सल होणे हे खूप नॉर्मल असायचे तेव्हा . मी चालत घरी जाण्याचा निर्णय घेतला.  बहिणीला चार किलोमीटर पायी देणे हे खूप जिकरीचे काम होते. आणि ...