माझ्यातला कलाकार
"पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल " अगदी समर्पक बोल आहेत आपल्या पु ल देशपांडे यांचे . माणसाचे स्वरूप भिन्न आणि वैविध्यपूर्ण असते दुसऱ्यासाठी जगण्या व्यतिरिक्त मानवी मन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कौशल्या कडे किंवा कले कडे झुकत असते जे त्याला आनंदित आणि व्यस्त ठेवते. ती कौशल्ये वाचन लेखन प्रवास चित्रकला इत्यादी असू शकतात. एक छंद म्हणजे एक विरंगुळा , जो आपल्याला संपूर्णपणे व्यस्त ठेवतो ,केंद्रित करतोआणि आनंदी ठेवतो. माझ्या जर्मनीतील अठरा वर्षांच्या वास्तव्यात आवडीच्या गोष्टी करायला खूप निवांत वेळ मिळाला , काही गोष्टी प्रयोग म्हणून करून पाहिल्या काही आवडल्या तर काही "दिस इज नॉट माय कप ऑफ टी" असे म्हणून कळल्या . त्यात जी आवड "छंद " म्हणून झाली ती म्हणजे चित्रकला. गेल्या पाच वर्षांपासून मी ॲक्रीलिक कलर आणि वॉटर कलर पेंटिंग शिकतआहे. विंटर मध्ये वेळ चांगला जातो आणि मन आनंदी राहते म्हणून चित्रकलेच्या आनंदात बुडून गेले. अनेक वेबसाइट्स आणि यूट्यूब व्हिडिओज वरून नवनवीन टेक्निक शिकत गेले , हळूह...