"बुक बॉक्स " एक उपक्रम
बुक बॉक्स " एक उपक्रम
टेक्नॉलॉजी
बदलत जातात पण माणसाच्या मूलभूत गरजा कायम रहातात. आता हे टेलिफोन बूथ बघा
ना..मोबाईल फोनचा काही वर्षापासून वाढत चाललेल्या उपयोगाने टेलिफोन बूथ हा
प्रकार आता जवळजवळ संपुष्टात आला आहे. तसेच पुस्तकांची जागा आता हळूहळू
आयपॅड आणि किंडल घेत आहेत.
तरीही मानवाची संवाद साधण्याची आवड
तशीच आहे व तसेच वाचनही मानवी अस्तित्वाचा महत्त्वाचा भाग आहेच. या दोन्ही
गोष्टींची सांगड घालून कोणी जर लोप पावलेल्या टेक्नॉलॉजीचा साक्षरता
उपक्रमासाठी उपयोग केला असेल तर हे अभिनवच नाही का?
'बर्लिन
' जर्मनीची राजधानी येथे असलेल्या इंस्टिट्यूट फॉर सस्टेनिबिलिटी एण्ड
एज्युकेशन एण्ड एम्पलोयमेट एण्ड कल्चर या संस्थेने टेलिफोन बूथ आणि पुस्तके
अशी साधी कल्पना एकत्र आणून "बुक बॉक्स " हा उपक्रम सुरू केला.
वाचनाची
आवड निर्माण करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या या उपक्रमाला गरज होती खूप
साऱ्या पुस्तकांची आणि टेलिफोन बुथची. त्यासाठी नागरिकांना वाचून झालेली
अथवा वापरात नसलेली पुस्तके आणून देण्याचेआवाहन केले यामुळे पुस्तके फेकून
देण्याऐवजी त्यांचा चांगला उपयोगही होणार होता, तसेच टेलिफोन बूथ कंपनीज चे
निरुपयोगी टेलिफोन बूथ पुन्हा कामी येणार होते.
उसवलेले
कपडे पुन्हा न शिवून घेणे तसेच वस्तू दुरुस्त करणे यापेक्षा ही नवीन वस्तू
विकत घेणे हे स्वस्त पडत असल्यामुळे जुन्या वस्तू फेकून देण्याची पद्धत
मला युरोपात अवगत होती , त्या धर्तीवर हा प्रोजेक्ट थोडे आश्चर्यच होते.
पुस्तके
शेअर करण्याची कल्पना ही काही नवीन नाही अनेक वर्षांपासून सार्वजनिक
वाचनालये, कम्युनिटी इन्स्टिट्यूट, बुक क्लब तथा बुक कॅफे याठिकाणी
पुस्तके एक्सचेंज करण्याचे उपक्रम होत असतात. तरीही या पद्धतीने सामान्य
लोकांची मदत घेऊन तसेच पब्लिक प्रोपर्टी चा चांगला उपयोग करून टाकाऊतून
टिकाऊ असे काहीतरी तयार होणार होते.
हौशी
विद्यार्थ्यांच्या मदतीने टेलिफोन बूथला रंगीबिरंगी रंगाने रंगविण्यात
आले. त्यात शेल्फ बसविण्यात आले. जमा झालेली पुस्तके तसेच विविध बोर्ड
गेम्स व लहान मुलांसाठी चे पुस्तक साहित्य हे विषयावर मांडण्यात आले. हे
सर्व काही नागरिकांच्या मदतीने करण्यात आले. तसेच बसून वाचता यावे यासाठी
बाहेर बेंचेसची व्यवस्थाही करण्यात आली.
बुक
बॉक्स साठी असलेले नियम थोडक्यात बोर्डवर लिहून ठेवलेले असतात. नागरिक
स्वच्छतेची तसेच पुस्तकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतात. पुस्तक हवे
असल्यास आपल्याजवळील एक पुस्तक तिथे ठेवले जाते. बुक बॉक्स हे 2४/७ उपलब्ध
आहेत तसेच यासाठी लायब्ररी कार्ड, मेंबर्शिप ही भानगड देखील नसणार.
हा
प्रोजेक्ट पूर्णतः जनतेच्या विश्वासावर चालतो येथे मॉनिटर करण्यासाठी
कोणीही बसलेले नसते तसेच कुठल्याही रजिस्टरमध्ये पुस्तकांची एन्ट्रीही
झालेली नसते.
पुस्तक घ्या आणि पुस्तक द्या तसेच पुस्तक वाचा या उपक्रमामध्ये पुस्तक देणारा आणि घेणारा या दोघांचाही फायदा आहे.
अशी
ही अभिनव मोफत पुस्तके देवाणघेवाण उपक्रमाने वाचनाची सवय निर्माण होण्यास
तर मदत झालीच पण लोकांच्या स्वेच्छेने सहभाग घेण्याने वेगळाच मानसिक आनंद व
सामाजिक बांधिलकीची जाणीवही निर्माण झाल्याचे दिसते.
आता जर्मनीतील इतरही शहरांनी हा उपक्रम राबविला आहे.
असेच एक बुकबॉक्स माझ्या घराजवळही आहे आणि यामुळेच हा अनुभव तुमच्याशी शेअर करण्याचा मला आनंद मिळाला.
लंडन , मेलबर्न शहरात तसेच इतर देशांमध्येही अशा पद्धतीचे प्रोजेक्ट्स अस्तित्वात आहेत.
ही अशी कल्पना तुम्हालाही आवडली असेल व असे उपक्रम राबवण्याची शक्यता तुमच्याही शहरात असेल तर तुम्हीही असे करू शकता.
Anagha Mahajan- Stuttgart Germany
Comments
Post a Comment