"बुक बॉक्स " एक उपक्रम

बुक बॉक्स " एक उपक्रम टेक्नॉलॉजी बदलत जातात पण माणसाच्या मूलभूत गरजा कायम रहातात. आता हे टेलिफोन बूथ बघा ना..मोबाईल फोनचा काही वर्षापासून वाढत चाललेल्या उपयोगाने टेलिफोन बूथ हा प्रकार आता जवळजवळ संपुष्टात आला आहे. तसेच पुस्तकांची जागा आता हळूहळू आयपॅड आणि किंडल घेत आहेत. तरीही मानवाची संवाद साधण्याची आवड तशीच आहे व तसेच वाचनही मानवी अस्तित्वाचा महत्त्वाचा भाग आहेच. या दोन्ही गोष्टींची सांगड घालून कोणी जर लोप पावलेल्या टेक्नॉलॉजीचा साक्षरता उपक्रमासाठी उपयोग केला असेल तर हे अभिनवच नाही का? 'बर्लिन ' जर्मनीची राजधानी येथे असलेल्या इंस्टिट्यूट फॉर सस्टेनिबिलिटी एण्ड एज्युकेशन एण्ड एम्पलोयमेट एण्ड कल्चर या संस्थेने टेलिफोन बूथ आणि पुस्तके अशी साधी कल्पना एकत्र आणून "बुक बॉक्स " हा उपक्रम सुरू केला. वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या या उपक्रमाला गरज होती खूप साऱ्या पुस्तकांची आणि टेलिफोन बुथची. त्यासाठी नागरिकांना वाचून झालेली अथवा वापरात नसलेली पुस्तके आणून देण्याचेआवाहन केले यामुळे पुस्तके फेकून देण्याऐवजी त्यांचा चांगल...