रंग सुरांचे

रंग सुरांचे कलेचा उत्कृष्ट कलाविष्कार हा कलाकाराने केलेल्या विविध प्रयोगांचे फलित असतो. मलाही माझ्या कलाक्षेत्रात असे प्रयोग करण्याची आवड आहे. त्यातीलच एक "लाइव्ह पेंटिंग" हेही माझ्या लिस्टवर होते. माझ्या मूड प्रमाणे शांततेत अथवा म्युझिक बरोबर चित्र काढणे ही माझी नेहमीची सवय. संगीत मला नेहमीच प्रेरणा देते, आणि चित्रकला हा माझा आवडीचा छंद. असे रंग आणि सूर एकत्र मिळाले तर तयार होतात रंग सुरांचे म्हणजेच लाईव्ह पेंटिंग विथ म्युझिक. हा प्रयोग पूर्ण करण्याची संधी मला महाराष्ट्र मंडळ स्टुटगार्ट मुळे गणेश उत्सवाच्या कार्यक्रमात मिळाली. असा प्रयोग मी प्रथमच करत असल्यामुळे मनात धाकधूक तर होती, पण करण्याची इच्छा जबरदस्त, म्हणून धैर्य एकटवून लगेच होकार दिला. माझ्याबरोबर अजून एक मैत्रीण चित्र काढणार आहे असे ठरले. तसेच अत्यंत उत्साही म्युझिक टीमही आमच्या मदतीला होती. म्युझिक टीम टीमने प्रसंगाला साजेसे असे सूर व बाप्पा चे गाणे ठरवले आणि आम्ही साजेशी रंग संगती ठरवली. अवघ्या चार मिनिटाच्या गाण्यावर गणपती बाप्पा साकारणे हे आमच्या समोर आव्हान होते तेही ...